महिलांसोबत आता पुरुषांनाही शनी चौथर्‍यावर बंदी, ग्रामस्थांनी मांडला ठराव

February 3, 2016 10:55 PM0 commentsViews:

Shani-Shingnapur-925615528sअहमदनगर – 03 फेब्रुवारी : शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश न देण्यावर ठाम असलेल्या शनैश्वर देवस्थानानंतर आता ग्रामस्थही पुढे सरसावले आहे. महिलांना काय आता पुरुषांनाही चौथर्‍यावर जाऊ दिलं नाही पाहिजे असा ठरावच ग्रामस्थांनी मांडलाय.

प्रसिद्ध शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलेनं जाऊन दर्शन घेतल्यानंतर एकच वादंग निर्माण झालंय. अलीकडे भूमाता ब्रिगेडच्या महिलांनाही शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी होणार्‍या या आंदोलनांमुळे आता ग्रामस्थांनी यावर तोडगा काढत कुणालाच चौथर्‍यावर जाऊ देऊ नका असा निर्णय घेतलाय. चौथर्‍यावर महिलांसोबत पुरुषांनाही प्रवेश बंदीचा ठराव आज शनि शिंगणापूर ग्रामसभेत मांडण्यात आला. हा ठराव शनी शिंगणापूर देवस्थानकडे पाठवण्यात येणार आहे. तसंच श्री श्री रवीशंकर यांच्या मध्यस्थीला ग्रामस्थांनी विरोध केलाय. 7 फेब्रुवारीला श्री श्री रवाशंकर मध्यस्थी करायला येणार आहेत. त्यांनी इथं येऊ नये असा इशारा ही ग्रामस्थांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close