वसईत पोलिसांची दंडुकेशाही

March 5, 2010 12:22 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीजनआंदोलन समितीचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी वसईत तुफान लाठीमार केला आहे. सामान्य नागरिकही पोलिसांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. अनेक ठिकाणी पोलिसांनी महिलांनाही मारहाण केली. तर परीक्षेवरून परतणारे विद्यार्थी आणि त्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांनाही पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. पोलीस घरात घुसून आंदोलकांना चोप देत आहेत.दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या विद्युलता पंडित या लाठीमारात जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर उपोषण करणारे आमदार विवेक पंडित यांची उचलबांगडी करून त्यांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.वसई विरार महापालिकेतून 53 गावांना वगळण्यात यावे या मागणीसाठी वसईत हे आंदोल सुरू आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा वसईत दाखल झाला आहे.