…तर वर्षभरातच होऊ शकतो एक्स्प्रेसवेवरचा टोल माफ !

February 4, 2016 10:03 AM0 commentsViews:

अद्वैत मेहता, पुणे

पुणे – 04 फेब्रुवारी : सरकारने मनात आणलं तर पुढच्या वर्षीच मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वेवरची टोल वसुली बंद होऊ शकते. कारण या टोलनाक्यावर 2015पासून ते आतापर्यंत तब्बल 2454 कोटी रूपये वसूल झालीये आणि कराराप्रमाणे आता फक्त 415 कोटी रूपये होणं बाकी आहे. जे येत्या वर्षाभरात अगदी सहजरित्या वसूल होऊ शकते. आता यावर आपलं सरकार असंही म्हणेल की हे कसं शक्य आहे. म्हणून आम्ही तुम्हाला एक्स्प्रेव-वेवरच्या टोलधाडीचं हे गणित जरा आणखी सोपं करून सांगतोय. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट…

Mumbai PuneToll

एक्स्प्रेस वेवरील टोलधाड खरंतर यापूर्वीच आरटीआयच्या माध्यमातून उघड झालीय. पण सरकार आणि कंत्राटदार दोघेही ही बाब मान्य करायला तयार नव्हते. म्हणूनच आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी गेल्या दहा वर्षातली टोल वसुलीची सगळी माहिती वेबसाईटवर टाकण्याची मागणी केली होती. सरकारनेही आता ही माहिती आता वेबसाईटवर टाकली आहे. यातूनच टोलधाडीची मोठी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

‘एक्स्प्रेस-वे’वरील टोलधाड

- करारानुसार 2019 पर्यंत 2,869 कोटींची टोलवसुली अपेक्षित
– 2005 पासून आतापर्यंत 2,454 कोटींचा टोल वसूल
– 2015 मधील अपेक्षित टोलवसुली 258 कोटी
– प्रत्यक्षात टोलवसुली 433 कोटी (जवळपास दुप्पट)
– आता फक्त 415 कोटींची टोलवसुली बाकी
– उर्वरित रक्कम 2016 मध्ये होऊ शकते वसूल
– मग 2019 पर्यंत टोलवसुली कशासाठी?

एक्स्प्रेस-वेवरची ही टोलधाड 2019पर्यंत अशीच सुरू राहिली तर कंत्राटदार किमान अकराशे कोटी रुपये जादा वसूल करू शकतो. म्हणूनच मुंबई -पुणे एक्स्प्रेस-वरची टोलवसुली सरकारने चालू वर्षातच बंद करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे.

ही टोलधाड कमी की काय म्हणून वाहनांच्या संख्येतही कंत्राटदाराने मोठा घोळ केल्याचं सरकारच्या व्हिडिओग्राफीत समोर आलं आहे. अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर कंत्राटदाराने तब्बल 40 टक्के वाहनसंख्या कमी दाखवलयाचं समोर आलं आहे.

शासकीय व्हिडिओग्राफीतली वाहनसंख्या ग्राह्य धरली तर कंत्राटदाराचे पैसे एव्हाना वसूल देखील झाले असतील. तरीही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे-वरची टोलधाड बंद करण्याच्या दृष्टीने सरकार कोणत्याच हालचाली करताना दिसत नाही. त्यामुळे किमान येत्या वर्षाकाठी तरी ही टोलधाड बंद करा, अशी मागणी जोर धरतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close