हॅप्पी बर्थ डे फेसबुक, 12व्या वर्धापन दिनी फेसबुककडून यूजर्ससाठी खास रिटर्न गिफ्ट

February 4, 2016 9:41 AM0 commentsViews:

fb birtdauy

04 फेब्रुवारी :  जगभरातल्या मित्रांना जोडणारं सर्वांचं लाडक्या फेसबुकचा आज बर्थ डे आहे. 12व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने फेसबुकनं आपल्या यूजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. आज तुम्ही फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करताच Happy Friends Day! या नावानं तुम्हाला तुमच्या आजवरच्या खास फोटोंचा एक व्हिडिओ दिसेल.

या व्हिडिओमध्ये तुमचे आणि तुमच्या मित्रांचे खास क्षण तुम्हांला पाहायला मिळणार आहेत. तसंच फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच याबाबत नोटिफिकेशन दिसून येईल. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करु शकता. अथवा एडिट करुन त्यात काही बदलही करू शकता.

फेसबुक आपल्या यूजर्सना कायमच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. जगभरातल्या मित्रांना जोडणारं फेसबुक आज 12 वर्षांचं झालं आहे. अवघ्या 19व्या वर्षी मार्क झुकेरबर्ग या तरूणानं 4 फेब्रुवारी 2004 रोजी आपल्या चार मित्रांसोबत फेसबुकची सुरूवात केली आणि काही काळातच फेसबुकनं गगनभरारी घेतली.आज जगभरात 1.5 अब्ज लोक फेसबुक वापरतात.

दरम्यान, फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आजचा दिवस फ्रेंड्स-डे म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले आहे. फेसबुक माहित नाही,असा एकही व्यक्ती सापडणार नाही. समाजमाध्यमांत सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांच्या यादीत फेसबुक अव्वल स्थानावर असल्याचा आनंद झकरबर्गने व्यक्त केला.

आज फेसबुकच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात आलेलं Happy Friends Day!चा व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. आपले खास क्षण जे कॅमेर्‍यात कैद झाले होते ते या व्हिडिओच्या माध्यामातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close