आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांवर खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांची परवानगी

February 4, 2016 2:39 PM0 commentsViews:

adarshashokchavan_181213

मुंबई – 04 फेब्रुवारी : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पाय आणखी खोलात गेलाय. चव्हाणांवर खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांनी सीबीआयला परवानगी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अडचणीत आले आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज यापूर्वीही सीबीआयनं तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे दिला होता. पण, त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता. ही कारवाई सुडबुद्धीनं होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आदर्श प्रकरणावरुन अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशोक चव्हाण महसूलमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आदर्ष सोसायटीमध्ये तीन सदनिका नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close