तोडफोड प्रकरणी भरपाईचे आदेश

March 5, 2010 12:30 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीहॉटेल इंटरकॉन्टिनेंटलच्या तोडफोड प्रकरणी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या, असा आदेश हायकोर्टाने शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांना दिला आहे. येत्या 8 मार्चपर्यंत ही नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. दळवी यांच्याकडून याआधीच 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली होती. गेल्या वर्षी 21 कामगारांच्या कपातीच्या मुद्दयावरून शिवसेनेने सहार विमानतळाजवळच्या हॉटेल इंटरकॉन्टीनेंटलमध्ये तोडफोड केली होती. या प्रकरणी माजी आमदार सीताराम दळवी यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत, सूर्यकांत महाडीक, अनिल परब अशा 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close