भाजपचं हे सूडाचं राजकारण -अशोक चव्हाण

February 4, 2016 5:23 PM0 commentsViews:

ashok chavanपालघर – 04 फेब्रुवारी : आदर्श प्रकरणी कारवाईही राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. भाजप सरकारवर जनता नाराज आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हे सूडाचं राजकारण सुरू आहे असंही चव्हाण म्हणाले.

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर खटला चालवण्यास सीबीआयला राज्यपालांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे चव्हाणांच्या अडचणीत आले आहे. आयबीएन लोकमतशी सर्वप्रथम बोलतांना चव्हाणांनी भाजप सरकारवर टीका केलीये.

भाजप सरकारचा प्रगतीचा आलेख शुन्य आहे. महागाई, दुष्काळ या ना त्या प्रकरणामुळे भाजप सरकार अडचणी आलंय. त्यामुळे जनतेचं लक्षवेधण्यासाठी ही सुडबुद्धीने राजकीय कारवाई केली जात आहे असा आरोप चव्हाण यांनी केलाय.

त्यावेळी राज्यपाल के. शंकरनारायन यांनी कायदेशीर बाजू तपासून परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांकडे परवानगी मागितली आहे. हे सर्व बेकायदेशीर आहे. भाजप सरकार सत्तेत आहे म्हणून हा सगळा खटाटोप केला जात आहे. याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊ असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close