दुबईत मराठीचा गजर

March 5, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीदुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मराठमोळ्या ग्रंथदिंडीने दुबईकरांना आकर्षित केले. लेझीम, भारुड, गोंधळ, पोवाडे आणि हरिनामाच्या गजरात निघालेल्या पालखीने जणू आखातच दुमदुमून टाकले. ग्रंथदिंडीनंतरच्या परिसंवादालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. दुबईतील इंडियन हायस्कूलच्या हॉलमध्ये हे साहित्य-संमेलन रंगले आहे. कालच संमेलनाचे शानदार उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. दुबईतील मराठी रसिकांनी पारंपरिक वेष परिधान करुन उत्सफुर्तपणे या संमेलनाला हजेरी लावली. संमेलनाचे आकर्षण असलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मनसेचे नेते शिरीष-पारकर, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव, अरुण दाते, शंकर अभ्यंकर आदी मान्यवरांनी उद्घाटनाला हजेरी लावली. 6 मार्च म्हणजे शनिवारपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे.

close