अधिवेशनासाठी शिक्षकांची रजा रद्द, औरंगाबाद खंडपीठाने दिली स्थगिती

February 4, 2016 6:51 PM0 commentsViews:

techer_schoolऔरंगाबाद – 04 फेब्रुवारी : राज्यस्तरीय अधिवेशनासाठी रजेवर निघालेल्या शिक्षकांना औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिलाय. अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना राज्य सरकारने दिलेली विशेष रजेला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिलीये. त्यामुळे शिक्षकांना अधिवेशनाला मुकावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं 35 वं राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबईत ऐरोली इथं 5 आणि 6 फेब्रुवारी होणार आहे. या अधिवेशनाला हजर राहता यावं म्हणून राज्यभरातील शिक्षक रजेवर गेले आहे. उस्मानाबादमध्ये काही शाळेतील शिक्षक तर अधिवेशनाच्या आधीच 7 दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे वर्ग ओस पडणार हे साहजिक होतं. काही ठिकाणी तर विद्यार्थीच शाळेत गुरजीची भूमिका पार पाडत होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीये. त्यावर आज सुनावणी झाली. शिक्षकांच्या विशेष रजेला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. यात अधिवेशनासाठी आता विशेष रजा घेता येणार नाही असं खंडपीठाकडून सांगण्यात आलंय. तसंच कोणत्या रजा घेता येतील यासाठी पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल असंही खंडपीठानं सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close