बारामतीचा बँडवादक तरूण बनला साहेब, एमपीएससीच्या परीक्षेत आला पहिला !

February 4, 2016 8:14 PM0 commentsViews:

जितेंद्र जाधव,बारामती – 04 फेब्रुवारी : अनंत अमुची ध्येयासक्ती…याचा प्रत्यय देणारं यश मिळवलंय बारामतीच्या शेखर नामदास या तरुणानं. बँडमध्ये ताशा वाजवणार्‍या शेखरनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून त्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मंत्रालय सहायक वर्ग-2 या पदावर त्याची नेमणूक होणार आहे.

बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणारा शेखर नामदास…तिथल्याचं एका बँड पथकात ताशा वाजवण्याचं काम शेखर करायचा. बँडमध्ये काम करत असतानाच त्यानं एका मोठ्या यशाला गवसणी घातली. भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी एपीएसीची परीक्षेत शेखरनं बाजी मारली इतकंच नाही तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात पहिला आला.

baramati_bandboyशेखरची आई मजुरी करते तर वडील ट्रॅक्टर चालक आहेत. शेखरच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट उपणार्‍या माऊलीला मुलाचं यश पाहून आकाश ठेंगणं झालंय.

ज्या बँडमध्ये शेखर काम करत होता. तिथंही त्याची छाप होती. सुरुवातीला हातात काठीही न धरता येमारा शेखर नंतर मात्र पट्टीचा ताशा वादक झाला. त्याच्या या यशाने बँडमधले त्याचे सहकारीही भाराऊन गेलेत.

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गरिबीशी संघर्ष करता येतो. आणि यशाची उत्तुंग भरारी घेता येते हेच शेखरने दाखवून दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close