अशोक चव्हाण आता प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा ‘आदर्श’ दाखवतील का ?

February 4, 2016 10:02 PM0 commentsViews:

मुंबई – 04 फेब्रुवारी : आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अडचणीत आले आहे. त्यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी राज्यपालांनी दिल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पण हे आपल्याविरोधात षड्‌यंत्र असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय. तर पुराव्यांच्या आधारे सीबीआय कारवाई करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

asokh chavan  freeआदर्श घोटाळा प्रकरण अशोक चव्हाणांची पाठ सोडायला तयार नाही असंच दिसतंय. ‘अशोक चव्हाणांवर खटला दाखल करा’ अशी परवानगी राज्यपालांनी दिली. पदाचा गैरवापर करून नातेवाईकांना फ्लॅट दिल्याच्या कारणामुळे चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यात आता सीबीआयला परवानगी मिळाल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा अडचणीत आले आहे.

यापूर्वीच्या राज्यपालांनी खटला चालवण्याची परवनागी नाकाराली होती. पण, आता मात्र 8 ऑक्टोबर 2015 ला युती सरकारच्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मत मागवलं आणि चव्हाणांविरोधात खटल्याला परवानगी दिली. त्यामुळे अडचणीत आलेल्या चव्हाणांनी हे सूडबुद्धीचं राजकारण असल्याचा आरोप केलाय.

पण, सरकारनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. आधी भुजबळ आणि आता अशोक चव्हाण यांच्या कारवाईमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. आदर्श प्रकरणामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार आहे का असाही सवाल विचारला जाऊ लागलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close