दुर्गम मेळघाटात ही गावं होणार डिजिटल, गावकर्‍यांसाठी 3 जी आणि एटीएम सेवा !

February 4, 2016 10:42 PM0 commentsViews:

 

मेळघाट – 04 फेब्रुवारी : कुपोषणाने कुप्रसिद्ध असणार मेळघाटातील हरिसाल गाव भारतातल पहिले डिजिटल गाव तयार होणार आहे. गावामध्ये डिजिटलायजेशन चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच 3 जी सुविधा, एटीएम आणि गावकर्‍यांना एटीएम कम डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.

melghat_gaonहरिसाल गावासोबत मेळघाटातील 56 गाव जोडल्या जाणार आहेत. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने 100 दिवसांत हरिसाल हे गाव डिजिटल होणार आहे. मेळघाटात एकूण 334 गाव आहेत आणि यापैकी अनेक गावंमध्ये कुपोषणासारख्या गंभीर समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावं
लागतंय. मुळात मेळघाटामध्ये संपर्काचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. कुठल्याही मोबाईलच टॉवर नसल्याने वेळेत कुठलीही सेवा स्थानिक लोकांपर्यंत पोहचू शकत नाही.एटीएम सेवा, बँकिंग सेवा,इंटरनेट यांसारख्या सुविधा नसल्याने मेळघाट कधीच मुख्य प्रवाहत येऊ शकला नाही . यामुळे कुपोषण बालमृत्यु यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत असतात. डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर तरी मेळघाट मुख्य प्रवाहात येईल असी अपेक्षा स्थानिकाना आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close