आमदार विवेक पंडित यांचे उपोषण मागे

March 5, 2010 1:05 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीआमदार विवेक पंडित यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फोन केल्यानंतर पंडित यांनी उपोषण मागे घेतले. वसई विरार महापालिकेतून 53 गावांना वगळण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तर आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला आहे.

close