सियाचीनमधील हिमस्खलनात 10 जवान शहीद, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

February 5, 2016 9:27 AM0 commentsViews:

siachen-avalanche_650x400_61454583556

सियाचीन- 05 फेब्रुवारी : सियाचीनमध्ये हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेले 10 भारतीय जवान शहीद झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) ट्विटरवर सर्व दहा जवान शहीद झाल्याची माहिती दिली . सियाचीनमध्ये बुधवारी हिमकडा कोसळल्याने दहा जवान त्याखाली दबले गेले होते. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होतं. परंतु सर्व जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराने दिली.

जवानांना वाचवण्यासाठी 40 तास सियाचीनमध्ये युद्धापातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. जसजशी वेळ जात होती तसे ढिगार्‍याखाली जवान जिवंत असल्याची आशाही मावळत होती.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून जवानांच्या धैर्याला सलाम करत त्यांना वीरमरण आल्याची माहिती दिली. जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत सियाचीनमध्ये झालेला अपघात अतिशय दु:खद होता, असंही पंतप्रधान म्हणाले.

भारतीय लष्कराची एक तुकडी 5800 मीटर म्हणजेच 19 हजार फूट उंचीवर गस्त घालत होती, त्यावेळी हिमकडा कोसळल्याने बर्फात दहा जवान अडकले होते. यामध्ये एका ज्युनियर कमिशन्ड अधिकार्‍यासह (जेसीओ) दहा जवानांचा समावेश होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close