मी खूप चूका केल्या, परमार यांच्या चिठ्ठीतील धक्कादायक खुलासा

February 5, 2016 12:31 PM0 commentsViews:

 

suraj parmar_buldier

ठाणे – 05 फेब्रुवारी : ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी नुकतंच चार नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचाही समावेश आहे. परमार यांचं सुमारे 20 पानांचे हे पत्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र या पत्रातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पत्रात परमार यांनी 4 नगरसेवकांवर बोट ठेवतानाच स्वत:च्या चुकांची कबूली दिली आहे. तसंच आपल्या चुकांमुळे कंपनी आणि कुटुंबियांचं भवितव्य उद्‌ध्वस्त झाल्याची खंतही त्यात व्यक्त केली आहे.

‘गेल्या दोन तीन वर्षांत मी खूप चूका केल्या. कायद्याचा व्यवस्थित अभ्यास केला नाही. माझ्या वकिलांनी योग्य सल्ले दिले नाहीत. पुणे आणि भिवंडीतील काव्या प्रकल्पांसाठी खरेदी केलेल्या जमिनींचे टायटल क्लीअर नव्हते. भागिदारांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या पॉवर ऑफ ऍटर्नीचा मी गैरवापर केला. ‘कॉसमॉस’मध्ये झालेल्या सार्‍या गैरव्यवस्थापनास मी एकटा जबाबदार आहे. मी स्वतःला स्मार्ट समजत होतो, परंतु, मी कंपनीचा कारभार योग्य प्रकारे सांभाळू शकलो नाही. मी केवळ चुका आणि मूर्खपणाच केला. माझ्या वकिलांनीही योग्य सल्ला न देता मोठ्या चुका केल्या. माझ्या या कृत्यामुळे मी कंपनी आणि माझ्या कुटुंबीयांचे भवितव्य उध्वस्त करत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. ‘माझ्या गैरव्यवस्थापनामुळे मला कुणाला तोंड दाखवायची लाज वाटत होती. परंतु, आपल्या मुलांना सांग तुमचे वडील ‘चीटर’ नव्हते,’ असंही त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close