टीव्ही अभिनेत्रीच्या घरात चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ, 5 लाखांची लूट

February 5, 2016 10:36 AM0 commentsViews:

Loveleen Kaur Sasan

मुंबई – 05 फेब्रुवारी : मुंबईत सामान्य नागरिकांमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत असताना आता कलाकारांनाही त्याचा फटका बसला आहे. टीव्ही कलाकार लवलीन कौर ससन हिच्या घरातून चड्डी बनियान गँगच्या चोरांनी पाच लाख रुपयांचा ऐवज लुटला असल्याची माहिती समोर आली आहे. चड्डी बनियान गँगचा हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मीरारोडमधील पूनम सागर कॉम्प्लेक्सच्या रिगल आर्केडमध्ये लवलीन कौर राहते. चड्डी बनियान गँग बुधवारी रात्री तिच्या घरी घुसले आणि पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.

इतकेच नाही तर चड्डी बनियान गँगच्या चोरांनी इमारतीच्या वॉचमनलाही बेदम मारहाण केली. मात्र त्यानं बचावासाठी आरडाओरडा केला आणि त्याचा जीव वाचला. नयानगर पोलीस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close