वसईत दंडुकेशाहीचा निषेध

March 6, 2010 9:14 AM0 commentsViews: 2

6 फेब्रुवारीवसई महापालिका क्षेत्रातून 53 गावे वगळण्याच्या मागणीसाठीचे आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यात पोलिसांनी 5 आंदोलकांना अटक केली आहे. पोलिसांनी काल केलेल्या तुफान लाठीमारात जखमी झालेले शेकडो कार्यकर्ते आणि वसईकर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. पोलिसांच्या कालच्या वर्तणुकीबद्दल वसई परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वसईजवळच्या वाघोली गावात पोलिसांचे एक वेगळेच हिंसक रूप पाहिल्याचे वाघोलीकरांनी सांगितले. आमदार विवेक पंडित नेतृत्तव करत असलेले हे आंदोलन वाघोलीपासून 10 किलोमीटरवर नगर परिषदेसमोर शांततेच्या मार्गाने सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी वाघोलीत लाठीचार्ज का केला? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.

close