लग्नास नकार देणार्‍या डॉक्टरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

February 5, 2016 4:54 PM0 commentsViews:

abad_2312141औरंगाबाद – 05 फेब्रुवारी : एका सहकारी डॉक्टरने लग्नाचे आमिष देऊन आपल्या सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप एका महिला डॉक्टरने केलाय. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर लग्नास तयार झालेल्या डॉक्टराने नंतर जाती कारण दाखवून नकार दिल्यामुळे डॉ. विनोद पाटील याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीये.

पीडित डॉक्टर आणि विनोद पाटील हे दोघेही एका खाजगी रूग्णालयात कामाला होते. त्या ठिकाणी दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. गेल्या दोन वर्षांपासून विनोद पाटील याने पीडित महिलेला लग्नाचं आमिष देऊन बलात्कार केल्याचा आरोप या महिला डॉक्टरने केलाय. पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर विनोद पाटील काल रात्री लग्नास तयार झाला. त्यानं तसं शपथपत्रही लिहून दिलं. मात्र नंतर त्यानं तू दुसर्‍या जातीची आहेत म्हणून मी लग्न करू शकत नाही असं सांगत लग्नास नकार दिला. त्यामुळे आज त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close