संतापजनक, मुंबईत 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

February 5, 2016 5:05 PM0 commentsViews:

rapeमुंबई – 4 फेब्रुवारी : मुंबईत एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधमाला अटक करण्यात आलीये.

गोरेगावजवळच्या दिंडोशी परिसरातली ही घटना आहे. आरोपीला आजूबाजूच्या लोकांनी धरून पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी सकाळपासून दारू पित होता. आणि रात्री साडे अकराच्या सुमाराला ही मुलगी आरोपीच्या घरातून बाहेर आली. तिचा फ्रॉक रक्तानं माखला होता. आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा आरोपीला विचारलं, की रक्त कसं काय येतंय, तेव्हा ती पडल्यामुळे तिच्या पायाला जखम झाली, असं उत्तर त्यानं दिलं. स्थानिकांचा या नराधमाचा संशय बळावला आणि त्याला चोप दिल्यावर त्यानं हे कृत्य केल्याचं कबूल केलं. त्यानं चॉकलेटचं आमिष दाखवून मुलीला घरी बोलवलं होतं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close