मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना स्थान नाही !

February 5, 2016 5:41 PM0 commentsViews:

uDdhav thackray banner]मुंबई – 05 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेनेत आता मेक इन महाराष्ट्राच्या आयोजनावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण मुंबईत होणार्‍या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच स्थान देण्यात आलेलं नाही, त्यासाठी सरकारकडून प्रोटोकॉलचं कारण देण्यात आलंय.

गिरगाव चौपाटीवर मेक इन महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलीये. आता या कार्यक्रमासाठी तयारी सुरू झालीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय. येत्या 14 तारखेला गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम पार पडणार आहे. पण, या कार्यक्रमाला भाजपने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर स्थान दिले नाही. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबीयांना फक्त निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आलंय. या आधीही शासकीय कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे या संभाव्य वादावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेतेय हे पाहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close