हे पाणी कसं पुरणार ?, उन्हाळ्याआधीच मराठवाड्यात पाणी’बाणी’

February 5, 2016 6:15 PM0 commentsViews:

marathwada_Water_damऔरंगाबाद – 05 फेब्रुवारी : उन्हाळा सुरू होण्याआधीच मराठवाड्यात पाणीटंचाईचं भीषण सावट दिसायला लागलंय. मराठवाड्याचा पाणी साठा झपाट्यानं कमी होतो आहे. आज घडीला मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात केवळ 6.23 टक्के जिवंत पाण्याचा साठा आहे.

औरंगाबाद परभणी आणि हिंगोलीच्या प्रकल्पांमध्ये थोडा का होईना पाणीसाठा आहे.मात्र, बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच पाणीसाठे कोरडे पडले आहेत. आता उन्हाचा तडाखा वाढत चालल्यानं जो पाण्याचा साठा आहे त्याचंही झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे. परभणीच्या येलदरी धरणात 5 टक्के तर निम्न दुधना धरणात 30 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 4.5 टक्के तर नांदेडच्या विष्णूपुरी धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बीडमधील माजलगाव, मांजरा आणि उस्मानाबादेतील निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव धरणं कोरडी ठाक पडलीये. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत बीड, उस्मानाबाद, लातूरमध्ये परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे.

हे पाणी कसं पुरणार ?

औरंगाबाद – जायकवाडी – 6.23 टक्के
परभणी – येलदरी – 5 टक्के
परभणी – निम्न दुधना – 30 टक्के
हिंगोली – सिद्धेश्वर – 4.5 टक्के
बीड – माजलगाव – 0 टक्के कोरडा
बीड – मांजरा – 0 टक्के कोरडा
उस्मानाबाद – निम्न तेरणा – 0 टक्के कोरडा
उस्मानाबाद – सीना कोळेगाव – 0 टक्के कोरडा
नांदेड – निम्न मनार – 0 टक्के कोरडा
नांदेड – विष्णूपुरी – 24 टक्के


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close