आमदार संजय दत्त यांच्या पीएची चौकशी

March 6, 2010 9:22 AM0 commentsViews: 3

6 फेब्रुवारीपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांचे खाजगी सचिव आरिफ पठाण यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. पण आरिफ पठाण काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तर या वृत्तानंतर आरिफ पठाण यांना पीए पदावरून हटवल्याचे आमदार संजय दत्त यांनी सांगितले आहे. आरिफ यांनी जर्मन बेकरी स्फोटप्रकरणातील काही संशयास्पद व्यक्तींना आसरा दिल्याचा तसेच त्यांना आर्थिक मदत केल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी एटीएसने त्यांची चौकशी केली. कल्याणच्या रजिया कॉम्पलेक्समध्ये राहणारे आरिफ डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन समितीचे सदस्यही होते. 2008मध्ये झालेल्या जयपूर स्फोटाच्या वेळीही त्यांचे नाव चर्चेत आले होते. आरिफ यांचा नाशिक, अहमदनगर, पुणे आणि इतर शहरांमध्ये ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. पण एटीएसचे प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

close