हॉल तिकीट न मिळण्याच्या भितीने विद्यार्थीनीची आत्महत्या

February 5, 2016 7:34 PM0 commentsViews:

suicide imgनवी मुंबई – 05 फेब्रुवारी : कॉलेजमधल्या गैरहजेरीमुळे हॉल तिकीट मिळणार नाही अशा प्रकारे देण्यात आलेली तंबी आणि मराठी विषयाचा अभ्यास न झाल्याची धास्ती यामुळे बारावीच्या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात घडली आहे. लिनता मानकामे असं आत्महत्या करणार्‍या विद्यार्थीनीचं नाव आहे.

ही विद्यार्थिनी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात शिकत होती. हॉल तिकीट मिळालं नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. असं लिनतानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तसंच परीक्षेत कमी गूण मिळाल्यास आई वडिलांची बदनामी होईल. अशी भीती देखील लिनताला सतावत होती. यामुळे तिनं आत्महत्या केली. तर सुधागड महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी आम्ही कुणालाही हॉल तिकीट देण्यापासून रोखलं नसल्याची प्रतिक्रिया दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close