पंढरपुरात इंग्रजीचा पेपर फुटला

March 6, 2010 9:27 AM0 commentsViews: 3

6 फेब्रुवारीदहावीची परीक्षा सुरू असतानाच पंढरपूर येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला आहे. कर्मवीर औदंुबर पाटील विद्यालयाचे क्लार्क सुधाकर दुपडे यांच्या घरी हा फुटलेला पेपर सापडला आहे. सकाळी 9च्या दरम्यान सुधाकर दुपडे हे पेपर घरी घेऊन जात असल्याची बातमी एका स्थानिक पत्रकाराने पोलिसांना दिली. आणि त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या क्लार्कच्या घरी धाड टाकली. यानंतर अजून एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे सुधाकर दुपडे यांच्या घरी दोन विद्यार्थी पेपर सोडवताना सापडले. हे दोन विद्यार्थी कर्मवीर औदुंबर पाटील विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

close