पुन्हा वीज दरवाढीचा शॉक

March 6, 2010 9:32 AM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारीराज्यातील महावितरणच्या ग्राहकांना 6 महिन्यात चौथ्यांदा वीज दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी 762 कोटी रुपयांचा हातभार देण्यास शुक्रवारी वीज नियामक आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या वार्षिक दरनिश्चितीची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा ग्राहकांना वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. एक नजर टाकूयात या वीज दरवाढीवर- गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात युनिटमागे 25 ते 30 पैसे वाढ करण्यात आली. त्यांनतर दोन महिन्यांनी म्हणजे गेल्या डिसेंबरमध्ये दाभोळ वीज प्रकल्पाच्या विस्तारासाठी ग्राहकांच्या वीजबिलात प्रतियुनिट 35 पैसे वाढ करण्यात आली.यावर्षाच्या सुरूवातीलाच जानेवारी महिन्यात राज्य सरकारने वीज कंपन्यांना वीजकरात वाढ करण्याची परवानगी दिली. त्यानुसार महावितरणच्या विजबिलात युनिट मागे 1 रुपये 20 पैशांची जादा वाढ झाली. आणिआता चौथ्यांदा युनिटमागे 10 ते 30 पैसे म्हणजे 10 टक्के वाढ करण्यास वीज नियामक आयोगाने परवानगी दिली आहे. एवढेच नाही तर पुढील आर्थिक वर्षासाठी लवकरच महावितरण कंपनीकडून वार्षिक महसुली पत्रक सादर केले जाणार आहे. त्यानंतर युनिटमागे 10 ते 30 पैसे वाढ होऊ शकते.

close