बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन

February 6, 2016 2:21 PM0 commentsViews:

विशाखापट्टणम – 06 फेब्रुवारी : विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन घडलं. आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सध्या विशाखापट्टणममध्ये सुरू आहे. भारताचे राष्ट्रपती आणि सरसेनापती प्रणव मुखर्जी यांनी या संचलनाचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. भारताच्या प्रमुख विनाशिका,पानबुड्या आणि युद्धनौकांनी धडाकेबाज शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा निर्माण केलाय.International_Fleet_Review-2016

भारताच्याही आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकासह महत्त्वाच्या विनाशिका आणि पाणबुडी या
संचलनात सहभागी झाल्यात. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती भारताची आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत. या सर्व संचलनात एकुण 25 हजार नौसैनिक सहभागी झाले आहे. ‘महासागरातून एकात्मता’ असं बोधवाक्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनात भारताचं सामरिक सामर्थ्यजगाला दिसणार आहे. यात अनेक कवायती सादर करण्यात आल्या. राष्ट्रपतींनी अनेक नौकांचा आढावा घेतला, आणि त्या नौकांवरच्या अधिकार्‍यांकडून मानवंदना स्वीकारली. पंतप्रधान मोदी अतिशय लक्ष देऊन सगळा कार्यक्रम बघत होते, आणि मध्येमध्ये दुर्बिणीचाही वापर करत होते. विशेष म्हणजे आज ते आपल्या बीएमडब्ल्यूमधून न येता रेंज रोव्हर या गाडीतून या संचलनासाठी आले. अमेरिका, रशिया, चीन, इंग्लँड, जपान आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य देशांच्या नौदलासह एकूण 50 देशांच्या युद्धनौका या संचलनात सहभागी झाल्या आहेत.

पाकिस्तानने सहभाग टाळला

विशाखापट्टणम येथे होत असलेल्या आंतराष्ट्रीय नौदल संचलनात जगभरातील 50 देशांचे नौदल सहभागी झालेत. या संचलनात सहभागी होण्यासाठी भारताकडून पाकिस्तान नौदलालाही निमंत्रण देण्यात आलं होतं. पण पाकिस्तान नौदल या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनात गैरहजर राहीलं आहे. यावरून पाकिस्तानचा भारताबद्दलचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. आयबीएन लोकमतला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान नौदलाने आपण या संचलनात सहभागी होत नसल्याचं भारतीय नौदलाला कळवलं असल्याची माहिती मिळाली आहे.

हे आहे भारतीय नौदलाचं सामर्थ्य

अस्त्रधारिणी नावाची भारतीय बचावनौका आहे. विमानाचा किंवा कोणत्या जहाजाचा अपघात झाला, तर त्याच्या शोध आणि बचावकार्यात ही नौका महत्त्वाची भूमिका बजावते. यावर समुद्राच्या तळाशी असलेल्या होड्या किंवा विमानाचे पार्टस् शोधण्याचं तंत्रज्ञान यामध्ये आहे.

सागरध्वनी.. महासागरात संशोधन हे तिचं वैशिष्ट्य..वेगवेगळ्या परिसरातली समुद्राची खोली. समुद्री प्राण्यांचं वास्तव्य आणि इतर जहाजांचा समुद्रातला वावर.. ह्या सगळ्याचा शोध घेणे, आणि लक्ष ठेवण्याचं काम ही नौका करते.

भारताच्या पाणबुड्यांनीही दिमाखदार सहभाग घेतला. . ही अणुऊर्जेवरही चालू शकते. समुद्रात जहाजांवर भीषण हल्ले करण्याची क्षमता, आणि शत्रूच्या रडारवर न दिसण्याची वैशिष्ट्य या पाणबुडीत आहे. कित्येक दिवस किनार्‍यावर न येता समुद्रात तग धरून राहण्याची क्षमता, आणि आत असलेल्या अधिकार्‍यांसाठी सर्व सोयी या पाणबुडीत असतात.

नौदलाच्या 3 चेतक हेलिकॉप्टर्सचं यावेळी संचलन पाहण्यास मिळालं. यात विशेष आहे ते 3 चॉपर्समधलं समन्वय. एकाच वेळी एका दिशेला वळणे किंवा उंची कमी करणे,चॉपर्स खाली आणणे. याला अनेक महिन्यांचा सराव, आणि अतिशय जास्त लक्ष केंद्रीत करावं लागतं.. आणि हेच वैशिष्ट्‌य असतं लढाऊ वैमानिकांचं..

नौदलाची हॉक विमानं.. मध्यम क्षमतेची ही लढाऊ विमानं आहेत. यातून बॉम्ब सोडणे आणि गोळीबार करण्याची क्षमता आहे.

नौदलाच्या चॉपरनं बचावकार्याचं प्रात्यक्षिक.. समुद्रात जहाज बुडत असलं किंवा कोणत्या तेलविहिरीला आग लागली, तर याच प्रकारे लोकांना वाचवलं जातं. यात कस लागतो तो वैमानिकाचा.. कारण समुद्राच्या इतक्या जवळ चॉपर नेणं आणि ते चॉपर त्या उंचीवर ठेवणं हे जरा कठीण असं काम आहे.

भारताची डॉर्नियर विमानं.. गस्त घालणे, समुद्रात जे सुरू आहे, त्याचे फोटो काढणे.. आपल्या दिशेने येणार्‍या विमानांचं वेध घेणे हे याचं मुख्य काम असतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close