IPL लिलाव – वॉटसन, युवी ठरले सर्वात महागडे खेळाडू

February 6, 2016 2:54 PM0 commentsViews:

IPLAuction2016नवी दिल्ली- 06 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या सिझनसाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. लिलावात शेन वॉटसन आणि अष्टपैलू युवराज सिंग सर्वात महाग खेळाडू ठरला.

शेन वॉटसनवर तब्बल 9 कोटी 50 लाखांची बोली लावत बंगलोर टीमने विकत घेतलंय. त्यापाठोपाठ हैदराबाद संघाने 7 कोटींची बोली लावत युवराज सिंगला तर आशिष नेहराला 5.5 कोटीला विकत घेतलं. तर पुणे टीमनं इंग्लंडच्या केविन पीटरसनला साडे 3 कोटी रुपयांत तर ईशांतसाठी 3 कोटी 80 लाख रुपयांची बोली लावत विकत घेतलं.  एकूण 315 खेळाडूंसाठी हा लिलाव झाला.

खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणं

शेन वॉटसन – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर – 9.5 कोटी
स्टुअर्ट बिन्नी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर – 2 कोटी

युवराज सिंग – हैदराबाद सनराईजर्स – 7 कोटी
आशिष नेहरा – हैदराबाद सनराईजर्स – 5.5 कोटी

ईशांत शर्मा – पुणे सुपर जाएंट्स – 3.80 कोटी
इरफान पठाण – पुणे सुपर जाएंट्स – 1 कोटी
केविन पीटरसन – पुणे सुपर जाएंट्स – 3.50 कोटी
मिचेल मार्श – पुणे सुपर जाएंट्स – 4.80 कोटी

ख्रिस मॉरिस – दिल्ली डेअरडेविल्स – 7 कोटी
ब्रॅथवेट – दिल्ली डेअरडेविल्स – 4.20 कोटी
संजू सॅमसन – दिल्ली डेअरडेविल्स – 4.2 कोटी

दिनेश कार्तिक – गुजरात लायन्स – 2.30 कोटी
स्मिथ – गुजरात लायन्स – 2.30 कोटी
डेल स्टेन – गुजरात लायन्स – 2.30 कोटी

मोहित शर्मा – किंग्ज इलेव्हन पंजाब – 6.50 कोटी
मार्कस स्टॉइनिस – किंग्ज इलेव्हन पंजाब – 50 कोटी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close