लाठीमाराच्या चौकशीचे आदेश

March 6, 2010 9:50 AM0 commentsViews:

6 फेब्रुवारीवसई-विरार भागात काल झालेल्या लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत.कोकण रेंजचे आयजी परमबीर सिंह यांना ही चौकशी करण्याचे आदेश आर. आर. यांनी दिले. या बाबतचा अहवाल परमबीर यांना एका आठवड्यात द्यावा लागणार आहे. हा लाठीमाराचा प्रकार निश्चितच गंभीर होता, अशी कबुलीही आर. आर. यांनी दिली आहे. या लाठीमाराची दृश्ये आणि फोटो आपण पाहिले आहेत. अशा पद्धतीने लाठीमार करणे गरजेचे होते का? लाठीमाराचे आदेश कोणी दिले? हा लाठीमार टाळता आला असता का? याबाबतची माहिती आपण घेत आहोत, असेही आर. आर. यांनी म्हटले आहे.वसई महापालिका क्षेत्रातून 53 गावे वगळणाच्या मागणीसाठीचे आंदोलन दडपण्याच्या निमित्ताने काल पोलिसांनी जोरदार लाठीमार केला होता. यात पोलिसांनी अगदी घराघरांत घुसून लाठीमार केला. त्यात आंदोलकांव्यतिरिक्त इतर नागरिक, महिला आणि मुलांवरही लाठीमार झाला आहे.

close