नाशिकमध्ये पोलिसांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

February 6, 2016 5:25 PM0 commentsViews:

nashik_studentनाशिक – 06 फेब्रुवारी : हॉल तिकीट आणण्यासाठी गेलेल्या एका दहावीतल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीये. साकीबखान पठाण असं या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यासाकीबच्या डाव्या कानास गंभीर दुखापत झाल्यानं त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे साकीब हा तरुण निवृत्त पोलीस अधिकार्‍याचा नातू आहे.

शहराच्या राणे नगरभागात असलेल्या सेंट फ्रान्सीस शाळेत 10 च्या परीक्षेचं वेळापत्रक घेण्यासाठी साकीबखान पठाण आपल्या मित्रांसहित आला होता. या परीक्षेच्या वेळापत्राकासाठी शाळेत मोठी गर्दी झाल्यानं शाळा प्रशासनानं पोलिसांना बोलावलं होतं. पण, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी आल्या-आल्या प्रवेशद्वाराजवळील गर्दीला हटवण्यास सुरुवात केली. आणि याच वेळी साकीबच्या कानात त्यांनी लगावली. आपल्यास जातीवाचक शिवीगाळ करुन सावंत यांनी मारहाण केल्याचा आरोप साकीबखान च्या कुटुंबियांनी केला आहे.

हेमंत सावंत यांच्या तावडीतून सुटुन पळण्याचा प्रयत्न करणार्‍या साकीबच्या पाठीवर सावंत यांनी लाठीही फेकून मारल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना इंदिरानगरच्या पोलीस कर्मचार्‍यांसोबत घडल्याचा आरोप साकीबच्या कुटुंबियांनी केला आहे.

या पूर्ण प्रकऱणाची चौकशी करुन पोलीस निरीक्षक हेमंत सावंत याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी साकीबखानचे आजोबा निवृत्त पोलीस अधिकारी उमरखान पठाण यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close