विक्रोळीत सिलेंडर स्फोटात महिलेसह 2 मुलांचा मृत्यू

February 6, 2016 6:23 PM0 commentsViews:

vikroli43wमुंबई – 06 फेब्रुवारी : विक्रोळी इथं पार्कसाईट भागात सिलेंडर स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेसह दोन मुलांचा समावेश आहे.

पार्कसाईट भागात आनंदगड नाका इथं एका गादी कारखान्याला दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास आग लागली. शार्टसर्किटमुळे ही आग लागली आणि आगीने रौद्ररुप धारणं केलं आणि वरच्या मजल्याला सुद्धा आग लागली. या गादी कारखान्याच्या वरच घर होतं. आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला. दुकान मालक सलीम बेलिन हा बाहेर निघाला पण त्यांची पत्नी सलमा आणि दोन मुलं मोहसीन आणि मेहराज घरातच अडकली. यात ते जागीच जळून ठार झाले. या आगीत मोहसीन या दहा वर्षांच्या मुलाचा आणि मेहराज या 15 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला. अग्नीशमन दल या ठिकाणापासून फ़क्त 300 मिटर अंतरावर आहे. पण जागा अतिशय दाटवटीची असल्याने अग्निशमन दलाला पोहचण्यास अर्धा तास लागला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close