फिल्म रिव्ह्यु : ‘घायल वन्स अगेन’

February 6, 2016 7:30 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

राजकुमार संतोषीने दिग्दर्शित ‘घायल’ येऊन आता सव्वीस वर्षं झाली…सनी देओलने साकारलेला अजय मेहरा आणि अमरिश पुरीचा खलनायक बलवंत सिंग प्रचंड हिट झाले होते. अन्नू कपूरचा अभिनयही चांगलाच लक्षात राहिलाय. सव्वीस वर्षांनंतर ‘घायल’ सनी म्हणजेच अजय मेहरा परत आलाय. आता त्याचं थोडं वय झालं असलं तरी दुष्मनांचा मुकाबला करायला ‘ढाई किलो का हाथ’ अजूनही समर्थ आहे.

नवीन काय ?

ghayal2ब्रुस विलीसच्या डाय हार्डसारखा किंवा बोर्न सिरीजची आठवण यावी असं सिनेमाचं टेकिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे सनी देओलने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय, आणि इथेच सगळा घोळ झालाय. कारण आपल्यातल्या दिग्दर्शकीय कल्पनांना नव्वदीतून बाहेर काढण्यात तो अयशस्वी ठरलाय. पण, सनी देओलच्या फॅनसाठी ही एक चांगली मेजवानी आहे. कारण, सनी देओलने आजही ऍक्शनपॅक हिरोची भूमिका यशस्वीपणे साकारली आहे.

परफॉर्मन्सghayal3

खरंच आहे, सनी देओलने दिग्दर्शनाची जबाबदारी दुसर्‍या कुणावर तरी सोपवायला हवी होती. मघाशी उल्लेख केलेल्या हॉलीवूडच्या बोर्न सिरीजवर आधारलेले दोन पाठलागाचे प्रसंग उत्तम झालेत. याशिवाय सिनेमाचा खलनायक, नरेंद्र झा, जो हैदरमध्ये शाहीद कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत होता, घायलमध्ये त्याने खूपच चांगलं काम केलंय. अर्थात, अमरिश पुरी यांची उणीव भासत असली तरी आधुनिक जमान्यातला खलनायक म्हणून नरेंद्र झा शोभून दिसतो.

रेटिंग 100 पैकी 50


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close