समुद्रातले योद्धे !

February 6, 2016 7:51 PM0 commentsViews:

विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन घडलं. आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सध्या विशाखापट्टणममध्ये सुरू आहे.  भारताच्या प्रमुख विनाशिका,पानबुड्या आणि युद्धनौकांनी धडाकेबाज शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा निर्माण केलाय.भारताच्याही आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकासह महत्त्वाच्या विनाशिका आणि पाणबुडी या संचलनात सहभागी झाल्यात. या सर्व संचलनात एकूण 25 हजार नौसैनिक सहभागी झाले आहे. ‘महासागरातून एकात्मता’ असं बोधवाक्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनात भारताचं सामरिक सामर्थ्यजगाला दिसणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close