मुंबईत उद्या मदतनिधी मॅच

March 6, 2010 10:02 AM0 commentsViews: 2

6 फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकेबरोबरच्या वन डे सीरिजनंतर भारतीय क्रिकेट टीम सुटीवर आहे. पण क्रिकेटपासून दूर नाही. भारतीय टीममधले सध्याचे तमाम क्रिकेटर उद्या मुंबईत जमणार आहेत, ते एका मदतनिधी मॅचसाठी. भारताचा माजी क्रिकेटर सलील अंकोलासाठी ही मॅच आयोजित करण्यात आली आहे.सचिन इलेव्हन विरुद्ध गांगुली इलेव्हन या दोन टीममध्ये ही मॅच होणार आहे. भारतीय टीममधले आजी माजी क्रिकेटर्स या मॅचमध्ये सहभागी होणार आहेत. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर ही डे नाईट मॅच होणार आहे. सलील अंकोला भारतीय टीमकडून एक टेस्ट मॅच आणि 20 वन डे मॅच खेळला. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये मात्र 8 वर्षे त्याने मुंबई टीमचे प्रतिनिधित्व केले. आणि यात 54 टेस्टमध्ये त्याने 181 विकेट्स घेतल्या.

close