डॉक्टराची गुंडगिरी, केस पेपर हरवला म्हणून रुग्णाला बेदम मारहाण

February 6, 2016 9:01 PM1 commentViews:

latur_hospitalलातूर- 06 फेब्रुवारी : ‘डॉक्टर तुमचा मित्र’ असं म्हटलं जात पण लातूरमध्ये या उलट प्रकार घडलाय. केस पेपर हरवले म्हणून डॉक्टरांनी डॉक्टरांनी आणि सुरक्षा रक्षकांनी दादागिरी करत चक्क रुग्णालाच बेदम मारहाण केली आहे.

लातूर शहरात राहणारे बाबुराव कुंभार यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक चक्कर येऊ लागल्याने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत देखभालीसाठी त्यांच्या पत्नी रेखा कुंभार या देखील होत्या. कालपासून बाबुराव यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, आज दुपारी अचानक एक डॉक्टर आले आणि त्यांनी केस पेपर हरवल्याच सांगत या पेशंटला दवाखाना सोडायला सांगितला. उपचार सुरू असताना असे अचानक बाहेर काढू नका अशी विनवणी बाबुराव कुंभार आणि त्यांच्या पत्नी रेखा कुंभार यांनी केली. मात्र आपल्याच डॉक्टरी थाटात धुंद असलेल्या डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला बोलावून बेदम मारहाण केली. मारहाण एवढी जबर होती की त्यात रेखा कुंभार यांचं तोंडाला इजा झाली तर बाबुराव यांच्या हाताला दुखापत झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vaibhav V. Mahankale

    लोकमत सारख्या वृत्तपत्राने ह्या बातमीची शहानिशा करणे आवश्यक होते . जे काही सांगितले ते पूर्णतः खोटे आहे !! काही तरी नवीन शीर्षक भेटले आणि सर्वांचे फक्त लक्ष्य वेधण्याचे काम केलेले आहे लोकमत वृत्तापात्राने. लोकमत चे “फेकमत” हे नाव योग्य ठरेल.

close