पंजाबमध्ये बीएसएफकडून चार तस्करांना कंठस्नान

February 7, 2016 1:20 PM0 commentsViews:

_f81bea88-8d36-11e5-8abe-9658c5a0e511

चंदिगड –  07 फेब्रुवारी : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. त्यात दोन पाकिस्तानी व दोन भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यांच्याकडून कोटय़वधी रूपयांची हेरॉईनची 10 पाकिटे जप्त करण्यात आली.

बीएसएफ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीतून पाच जण भारतीय हद्दीत प्रवेश करीत असल्याचे बीएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, हे पाचही जण पळू जाऊ लागले. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यात चारजण ठार झाले, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, गोळीबारात ठार झालेल्या नागरिकांजवळ हेरॉईनची 10 पाकिटे आढळून आली. त्याची किंमत कोटय़वधींच्या घरात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close