संमेलनाचा आज समारोप

March 6, 2010 10:11 AM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारीदुबईत सुरु दुसर्‍या विश्व साहित्य संमेलनाचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. या संमेलनात दोन दिवसांपासून वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. आज कवी संमेलन आणि परिसंवादाचे आयोजन केले गेले आहे. डॉक्टर अनिल अवचट यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार होता. मात्र अवचट यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. संमेलनात सादर झालेले विविध कार्यक्रम, गाणी यांचा आस्वाद मराठी रसिकांनी घेतला.

close