शिवसेनेकडून पुण्यात हेल्मेटची अंत्ययात्रा

February 7, 2016 4:18 PM0 commentsViews:

Helmet funeral131

पुणे – 07 फेब्रुवारी : हेल्मेट सक्तीविरोधात शिवसेनेने पुण्यात हेल्मेटची अंतयात्रा काढून राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आधी रस्ते चांगले करा, असं म्हणत शिवसैनिकांनी हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध दर्शवला.

पुण्यात हेल्मेटसक्तीला जोरदार विरोध करण्यात येत आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेने हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला. त्यानंतर आज पुण्यात शिवसेनाही हेल्मेट सक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरली. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटची अंत्ययात्रा काढून या सक्तीचा निषेध नोंदवण्यात आला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेट सक्ती करू नये, यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी बाबर यांनी केली आहे. तसंच मृत्यू हा फक्त हेल्मेट न घातल्याने होत नसल्याचं सांगत चांगले रस्ते बांधण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

तर दुसरीकडे निगडी इथे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी हेल्मेट परिधान करून आंदोलन करत हेल्मेट सक्तीचे जोरदार समर्थन केलं. तसंच आधी जनजागृती करावी. त्यानंतरच हेल्मेट सक्ती करावी, या मागणीचं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close