गोरेगाव येथे 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

February 7, 2016 8:21 PM0 commentsViews:

rape dsngfsdg

मुंबई – 07 फेब्रुवारी : गोरेगाव पूर्व येथे राहणार्‍या पाच वर्षांच्या चिमुरडीवर त्याच परिसरात राहणार्‍या 22 वर्षाच्या तरुणाने गुरुवारी दुपारी खाऊचे अमिष दाखवून स्वत:च्या घरात आणून लैगिंक अत्याचार केला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत आज दिंडोशी कोर्टासमोर रास्ता रोको केला आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस भाड्याने देण्यात येणार्‍या घरांचे योग्य प्रकारे पडताळणी करत नसल्याचा राहिवश्यांचा आरोप आहे. यावेळी स्थानिकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा ही दिल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close