अखेर चड्डी बनियान गँग सापडली, 4 जण गजाआड

February 8, 2016 12:40 PM0 commentsViews:

chaddi baniyan gang44मुंबई – 08 फेब्रुवारी : बोरिवली, कल्याण -डोंबिवलीमध्ये हैदोस घालणार्‍या चड्डी बनियान गँगच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. चड्डी बनियान टोळीतील 4 जणांना पोलिसांनी गजाआड केलंय. तर 3 जणांनी पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे.

आज पहाटे 3 च्या सुमारास चड्डी बनियान टोळीने बोरिवलीमधील एका घरात प्रवेश केला आणि घरातील दोन वरिष्ठ नागरिक पती-पत्नीला जबर मारहाण केली. तसंच घरातील किंमती ऐवज लुटला. घरात प्रवेश करताना चड्डी बनियान गँग टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चड्डी बनियान टोळीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही गँग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. कुणाच्या तावडीत सापडू नये म्हणून अंगाला तेल चोपडून, फक्त चड्डी आणि बनियानवर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या पद्धतीमुळे मुंबईकरांमध्ये दहशत पसरली होती. अखेरीस पोलिसांनी आज मोहिम फत्ते करत या टोळीतील 4 जणांना पकडलंय. परंतु, 3 जण झुडपात उड्या टाकून बोरिवलीच्या जंगलात पळून गेले. या गँगने पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं समजतंय. बोरिवलीच्या जंगलात पसार झालेल्या या गँगच्या तिघांचा पोलीस कसून शोध घेत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close