‘ती’ने घेतलं जमिनीत गाडून

February 8, 2016 3:33 PM0 commentsViews:

राज्यात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढत आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नागपूरमध्ये एका कलाकारानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. श्वेता भट्टड या कलाकाराने स्वत:ला कॉफिनमध्ये कैद करून जमिनीत दोन तासांसाठी गाडून घेतलं. या कॉफिनमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करा नंतर सातवा वेतन आयोग लागू करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. श्वेतानं हाच प्रयोग पॅरिसमध्ये केला होता. हा प्रयोग पाहण्यासाठी नागपूरच्या वसंतराव देशपांडे हॉलच्या परिसरात हजारो शेतकरी आलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close