…त्या जिल्ह्यांमध्ये वृक्षतोडीवर पूर्ण बंदी

March 6, 2010 2:39 PM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारीज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे, अशा जिल्ह्यांत वृक्षतोडीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. या परिषदेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश उपस्थित होते.महाराष्ट्राचे पर्यावरण राखण्यासाठी पश्चिम घाटांच्या जंगलांकडे लक्ष द्यायला हवे, असे जयराम रमेश यावेळी म्हणाले. तापमान वाढीचे आव्हान पेलण्यासाठी विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखायला हवा, असे मत या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी मांडले.

close