प्रख्यात उर्दू शायर निदा फाजली यांचं निधन

February 8, 2016 4:28 PM0 commentsViews:

nida fazil

मुंबई – 08 फेब्रुवारी : ‘होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’, अशा एकापेक्षा एक सरस गझल तसंच लोकप्रिय काव्यसंग्रहाचं लिखाण करणारे प्रख्यात उर्दु शायर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार निदा फाजली यांचं हद्यविकाराच्या झटक्यानं आज (सोमवारी) मुंबईत निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.

मुंबईतल्या वर्सोवा इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निदा फाजली यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1938 रोजी दिल्ली येथे एका काश्मिरी कुटुंबात झाला. त्यांचे वडिलही उर्दू शायर होते.

रझिया सुल्तान, सूर, सरफरोश अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. निदा फाजली यांच्या ‘खोया हुआ सा कुछ’ या काव्यसंग्रहासाठी 1998मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते. तर 2013 साली पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. निदा फाजलींच्या जाण्यानं उर्दू शाहरीच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close