समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

February 8, 2016 8:12 PM0 commentsViews:

sameer bhujbal

मुंबई – 08 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ यांच्या न्यायलयीन कोठडीत 22 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. समीर भुजबळ यांना 1 फेब्रुवारी रोजी इडीने 9 तास कसून चौकशी केल्यानंतर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक केली होती. आज मुंबई न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर, समीरपाठोपाठ ईडीनं पंकज भुजबळांनाही समन्स बजावलं आहे. उद्या सकाळी 10 वाजता पंकज यांना ईडीने आदेश दिले आहेत. त्यामुळे इडीच्या या कारवाई भुजबळ कुंटुंबीयांविरुद्ध कारवाईचा फास आवळ्लयाचं दिसतं आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांची ईडी कोठडी आज संपली होती. मात्र पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तीन कंपन्यांमध्ये पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनमध्ये कॉन्ट्रॅक्टरला फायदा मिळून देणं आणि त्या बदल्यात स्वत:च्या कंपनीला फायदा मिळवणं, असे आरोप समीर भुजबळांवर लावण्यात आलेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ उद्या अमेरिकेहून मुंबईला परत येणार असून त्यांचं स्वागत करण्याच्या नावाखाली भूजबळ समर्थक जोरदार श्क्तीप्रदर्शन करणार आहेत. तसंच छगन भुजबळ उद्या पत्रकार परिषेद घेणार असल्याची माहीती नवाब मलिक यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close