शेतकर्‍यांसाठी खूशखबर! यंदा भरपूर पाऊस पडण्याची शक्यता

February 8, 2016 9:45 PM0 commentsViews:

Farmer rain

मुंबई – 08 फेब्रुवारी : दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची दाट शक्यता आहे. कारण अल निनो या प्रशांत सागरातल्या दुष्टचक्राचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून देशावर असलेल अल निनोचं संकट आता विरलं असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

2014-15 या सलग दोन वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदा फेब्रुवारीतच राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पाणीसाठा संपला आहे. पण, हवामान खात्याच्या नोंदींकडे पाहिल्यास 2016च्या मान्सूनचे चित्र सकारात्मक दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांच्या मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव होता. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण या वर्षी ‘अल निनो’ची जागा ‘ला निना’ घेण्याची शक्यता आहे. अल निनोमुळे प्रशांत सागरावर उष्ण वार्‍यांचं दुष्टचक्र निर्माण होतं. त्यामुळे मॉनसूनचे वारे प्रभावित होतात. पण ‘ला निना’मुळे प्रशांत सागरावर थंड वारे वाहतात आणि त्याची मदत मॉनसूनच्या वार्‍यांना होते. 1950 पासूनच्या आकडेवारीनूसार, ज्या वर्षी ‘ला निना’चा प्रभाव प्रशांत सागरात होतो, त्या वर्षी भारतात सरसरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हवामानाची सद्यस्थिती आणि इतिहास पाहता यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारता व्यतरिक्त ला निनाचा फायदा अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझिल या देशांनाही होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close