‘महिला आरक्षण विधेयक मंजूर होणारच’

March 6, 2010 2:57 PM0 commentsViews: 27

6 फेब्रुवारीयंदाच्या महिला दिनाचा मुहूर्त साधत सरकार सोमवारी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडणार आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. विधेयक मंजूर होण्याची खात्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारला चांगल्या संख्याबळाचा पाठिंबा आहे. भाजप आणि डाव्या पक्षांनी याला याआधीच पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांचा मात्र या विधेयकाला विरोध आहे. या आरक्षणात मागासवर्गीय महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांचा विरोध मावळावा यासाठी सरकार या पक्षांशी वाटाघाटी करत आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कालच यांसदर्भात लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व महिला खासदारांशीही चर्चा केली आहे. आता जेडीयूनेही महिला विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

close