नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचं निधन

February 9, 2016 8:39 AM0 commentsViews:

sushil_koiralaकाठमांडू – 09 फेब्रुवारी : नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचं निधन झालंय.. ते 77 वर्षांचे होते. सोमवारी रात्री काठमांडू इथं महाराजगंज इथल्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. कोईराला गेले चार दिवस आजारी होते. फेब्रुवारी 2014 मध्ये कोईराला यांना नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं होतं. ते नेपाळी काँग्रेसचे अध्यक्षही होते. 1954 मध्ये कोईराला यांनी राजकारणात प्रवेश केला. 1960मध्ये त्यांना राजकीय दृष्ट्या विजनवासात जावं लागल्याने 16 वर्षं ते भारतात राहिले 1998 मध्ये ते नेपाळचे उपराष्ट्रपतीही बनले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close