तीन एकांकिकांचा महोत्सव

March 6, 2010 3:08 PM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारीइंद्रधनु या नाट्यसंस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने लेखक आशिष पाथरे यांनी लिहिलेल्या तीन एकांकिकांचा महोत्सव यशवंत नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला. राजन खान यांच्या कथेवर आधारीत 'दंगल सुरु आहे', 'वधुपरीक्षा' आणि 'रोज मरे त्याला' या तीन एकांकिका सादर झाल्या.जागतिकीकरणाच्या रेट्यात सामान्य माणसाची जातीय दंगलीमुळे होणारी होरपळ, स्पर्धेच्या युगात टिकाव न लागल्याने होणारी निराशा, आणि आत्महत्या असे विषय मुंबईकरांसमोर या एकांकिकांमधून मांडण्यात आले.एकांकिकाना प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आला होता. यावेळी नाट्यरसिक या तरुण रंगकर्मींना दाद देण्याकरता आवर्जून उपस्थित होते.

close