नगरसेविकेच्याच घरी चोरी, 13 तोळे सोनं आणि 4 लाख रोख लंपास

February 9, 2016 11:32 AM0 commentsViews:

kalyan_tifकल्याण – 09 फेब्रुवारी : गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीत धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांनी आता तर चक्क लोकप्रतिनिधींना लक्ष केलंय. काल सोमवारी महापालिका नगरसेविकेच्या घरावर डल्ला मारत चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आवाहन दिलंय. कल्याण पूर्वेकडील कैलाश नगरच्या शिवसेनेच्या नगरसेविका सारिका जाधव ह्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोन दिवस घराबाहेर असल्याची संधीसाधत चोरांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत जाधव यांच्या घरातून 13 तोळे सोनं आणि 4 लाख रोख रक्कम लंपास केलीये. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेकडील कैलाश नगरच्या शिवसेनेच्या नगरसेविका सारिका जाधव या दोन दिवस लग्न समारंभासाठी आपल्या परिवारासमवेत बाहेर गेल्या होत्या. हीच संधी चोरट्यांनी साधली. घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत यांच्या घरातून 13 तोळे सोने आणि 4 लाख रोख रक्कम लंपास केले आहे. आज सकाळी सारिका जाधव घरी परतल्या तेव्हा घरातील अस्तव्यस्त सामान पाहून त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले.

त्यांनी तत्काळ कोळसेवाडी पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली.तब्बल चार तासांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची औपचारीकता पूर्ण करत तपास सुरू केला आहे. चोरी झाल्याचे पोलिसांना कळवूनही पोलीस 4 ते पाच तास उशिराने घटनास्थळी आले असून पोलिसांना गांभीर्य नसल्याचे आरोप नगरसेविका सारिका जाधव यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close