अनैतिक संबंधाला अडथळा येणार्‍या मुलाची आईनेच केली हत्या, मृतदेह घरात पुरला

February 9, 2016 11:42 AM0 commentsViews:

pune_crime23पुणे – 09 फेब्रुवारी : पुण्यात पुन्हा एकदा आईच्या नावाला काळिमा फासणारी गंभीर घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्‍या आपल्या 15 वर्षांच्या मुलाचा खून करून घरात पुरल्याची घटना फुरसुंगी भागात घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईच्या अनैतिक संबंधामुळे निकोलस उर्फ निकू या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. निकोलस आणि त्याची आई ऋती हे दोन्ही मुळचे दिल्लीचे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मुलाची आई वरिता उर्फ ऋती आणि तिचा प्रियकर युनुस रहेमत अली या दोघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत मुलाची आई आणि तिच्या प्रियकराने दिल्ली येथून मुलाचे अपहरण केलं आणि फुरसुंगी येथील भाड्याच्या राहत्या घरात त्याचा खून करून पुरलं. निकोलसचे आजोबा जोसेफ जॉल यांनी देखील निकोलसच्या अपहरणाचा गुन्हा दिल्ली पोलिसांकडे दाखल केला होता. निकोलस कुठे आहे असं जोसेफ जॉल यांनी आपल्या मुलीकडे फोन करून विचारलं. त्यानंतर निकोलसने आत्महत्या केली असल्याने आम्ही त्याला घरातच पुरलं असं ऋतीने आपले वडील जोसेफ जॉल यांना सागितलं.

जोसेफ जॉल यांना ऋतीच्या बोलण्यावर संशय आला. आणि त्यांनी पुण्यात आपल्या नातवाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी फरार असून आरोपींचा शोध लावण्याचं पोलिसांसमोर मोठ आव्हान आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close