मुंबई पोलीस भरतीत चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

March 8, 2010 10:39 AM0 commentsViews: 12

8 फेब्रुवारीमुंबईत होणार्‍या पोलीस भरतीसाठीचे फॉर्म घेताना चेंगराचेंगरी झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. रमेश गोपीनाथ आंग्रे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. तो अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील लिंगदेव या गावचा रहिवासी आहे. या चेंगराचेंगरीत इतर 11 जण जखमी झाले आहेत. कलिना येथील मैदानात ही दुदैर्वी घटना घडली. पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायला आलेले तरूण इथे जमले होते.

close